मंगळवार, ८ जून, २०१०

बऱ्याच दिवसानी शाळेत जाऊन आलो. आमच्या कॅन्टीनचा फेमस वडा-पाव बऱ्याच दिवसात चाखला नव्हता, म्हणून त्या निमित्ताने क्लासेसहून परतताना शाळेत एक रपटा मारून यावं, आणि मस्त दोन-तीन वडापाव हाणावे, असा बेत होता. मात्र शाळेत जायचं खरं कारण वेगळंच होतं. मला बघायचं होती ती शाळेची नवी इमारत. मी दहावीत असताना या इमारतीचं बांधकाम सुरू झालं, ते अजून पूर्ण तर नाही झालं, पण विद्यार्थ्यांना या नव्या इमारतीत बसवायची सोय करण्यात आलेली आहे, असं ऐकलं होतं.
शाळेतल्या लायब्ररीमध्ये गेलो, दप्तर ठेवलं एका खुर्चीवर, आणि निघालो, शाळेच्या इमारतीला बघायला. खूपच सुंदर असं बांधकाम चालू आहे! आणि जेवढं झालंय ते इतकं "रिच' दिसतंय, बांधकामाचा कर्णकर्कश्श आवाज जरी मोठ्याने येत असला, तरी तिथून पाय निघेना. बघतच राहावंसं वाटत होतं. एकएका नव्या वर्गातून जाताना, शाळेतल्या सगळ्या आठवणी ताज्या होत गेल्या, आणि पुन्हा एकदा शाळेत जावंसं वाटायला लागलं.
आमच्या शाळेचा हा ब्लॉग : -
विद्या प्रसारक मंडळाचे विद्यामंदिर, दहिसर